महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला सरकारकडून नोकरी

आपल्या तेली समाजाची  शान जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून, विजय चौधरीची राज्य सरकारकडून डीवायएसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सलग तीन वेळेस महाराष्ट्र केसरी राहिलेल्या विजय चौधरीला लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2016 मध्ये जाहीर केले होते. तसेच हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2016 मध्ये विधानसभेत विजय चौधरीचे अभिनंदन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विजय चौधरीला शासकीय सेवेत घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज अखेर विजय चौधरीची डीवायएसपी अर्थात पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]