संताजी तेली साहित्य संमेलन

सालाबादा प्रमाणे श्री.संताजी महाराज जंयती गुरूवार दि. ८ डिसेबर २०१६ रोजी आहे. हिवाळी अधिवेशन चालू असल्याने श्रीक्षेत्र शेगाव येथे संताजी तेली साहित्य संमेलन नियोजित करता येईल. शेगाव तसे राज्यात मध्यवर्ती, रेल्वे-बस मार्गाचे-स्व वाहनाने येणे सेयीस्कर, रहाण्यास संस्थान रूम, कार्यक्रमास कार्यालय सुविधा उपलब्ध आहे. समाज बाधवाचे धार्मिक दर्शन व कुटूंबिक सहलही होऊ शकते. याबाबत सर्वानी दि.२८/८/२०१६ पर्यत मत-विचार ( सुचना नकोत ) मांडल्यास नियोजनास सुरवात करता येईल. त्याप्रमाणे सहभागीना प्रवास निच्छिती-पाहुणे नियोजन-संस्थान रूम-कार्यालय बुकींग वगैरे ठरविता येईल. तुर्तास डॉ.फुला बागुल,श् री.वाठजी, संजय येरणे, सुधीर सुर्वे, रामजी क्षिरसागर, डॉ.विजय पवार व सुभाष पन्हाळे यांचे तात्पुरते  ” तेली संमेलन-२०१६ ” तयारी मंडळ तयार करू.मत-विचार मांडताना “तेली संमेलन-२०१६ ” हेड लिहून  १)नाव-पत्ता-मोबाईल, २) मत-विचार  ३)सहभाग स्वरूप ४) बरोबर अंदाजे येणारे समाज बांधव यांची माहीती यांच अनुक्रमाने पाठवावी.
जे तेली समाज बांधव भगीनी संताजी तेली साहित्य संमेलनात  सहभागी होई इच्छित आहेत त्यानी आपले नाव-पत्ता-मोबाईल-सहभागी संख्या वगेरै  दि.२८/८/२०१६ पूर्वी पाठवावी. त्या प्रमाणे अंदाज येईल त्याप्रमाणे शेगाव संस्थान रूम-संनेलन कार्यालय-भोजन व्यवस्था लक्षात येईल.  दि.३०/८/२०१६ ला आढावा घेवूनच सर्व बाबी निच्छिती करून मांडल्या जातील. मग निच्छिती करून सर्वसाधारण पणे दि.१/९/२०१६ ला नियोजन अंतीम करता येईल.

 

संपर्क:

१)  श्रीहरी सातपुते ९८९००५२०५१

२) साहित्यिकानी वैयक्तीक माहीती डॉ.फुला बागुल ८८५६०४०५४० व सुजितकुमार रसाळ ९३९००५२०५१

३) नियोजन बाबत मत-विचार पन्हाळे ९७६४३०७५९३ व सुर्वे ९६५७६८३६८०

 

तरी सर्वाचे  स्वागत आहे. जय संताजी !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]