माझी रांगोळी!
घरासमोर काढलेल्या सुंदर रांगोळीचे छायाचित्र आमच्याबरोबर शेअर करा.
दिवाळी सण जसा दिव्यांच्या रोषणाईचा, फटाक्यांचा, फराळाचा, तसाच तो रंगांचा देखील! दिवाळीच्या दिवसामध्ये घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. घरासमोर काढलेल्या सुंदर रांगोळीचे छायाचित्र आमच्याबरोबर शेअर करून दिवाळीचा आनंद सगळ्यांसोबत साजरा करण्याची संधी “तेली समाज सेवक “ तुम्हाला देत आहे. ‘तेली समाज सेवक ’च्या ‘माझी रांगोळी’ संकल्पनेत सहभागी व्हा! आणि घरासमोरील रांगोळीचे छायाचित्र TelisamajSevak@gmail.com या ई-मेलवर ०५ नोव्हेंबरपर्यंत पाठवा. निवडक छायाचित्रांचा अल्बम ‘तेलीसमाजसेवक.कॉम ’वर प्रसिद्ध केला जाईल. तसेच या अल्बमची लिंक ‘तेली समाज सेवक’च्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. सर्वोत्कृष्ट छायाचित्राला ‘तेली समाज सेवक’च्या फेसबुक पेजवर ‘कव्हर फोटो’ होण्याची संधी मिळेल.