या सोप्या सवयी लावून घ्या आणि हृदयाला आजारांपासून दूर ठेवा

माणसाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयावांपैकी एक अवयव म्हणजे म्हणजे आपलं हृदय ! हृदय सलामत तर माणूस सलामत असं म्हटलं तरी वावग ठरू नये. म्हणूनच या हृदयाची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. सध्या धावपळीच्या जीवनामुळे हृदयाची खूपच हेळसांड होते. परिणामी आजारांना आमंत्रण दिलं जातं. सोबतच हार्ट अटॅकचा धोकाही बळावतो. म्हणजे जीवावरचं बेततं की सगळं ! सदानकदा घाईत असणाऱ्या मनुष्य प्राण्याला अश्या या हृदयाला निरोगी राखण्याचं सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठीचं आम्ही तुम्हाला आज काही फंडे सांगत आहोत, ज्याचं पालन केलं तर तुमच हृदय निरोगी राहील आणि सोबत तुम्ही देखील !

रोज योगा करा

yoga-for-heart-marathipizza

पहाटे उठून योगा करणं शरीरासाठी आणि विशेषत: हृदयासाठी अतिशय लाभदायक ठरतं. अतिशय कठीण आसने करावी असं काही नाही. साधी सोप्पी आसने केली तरी उत्तम !

 

स्विमिंग करा

keep-heart-healthy-marathipizza01

स्विमिंग केल्याने हृदय निरोगी राहतं आणि हृदयाला मजबुती मिळते. एवढंच नाही तर आपल्या शरीरातील मांसपेशी देखील मजबूत होतात.

 

रोज शिड्या चढा

walk-on-stairs-marathipizza

हृदय निरोगी राखायचा हा सर्वात सोपा उपाय. रोज लिफ्टचा आधार घेण्यापेक्षा शिड्या चढण्याची सवय लावून घ्या.

 

पालेभाज्या खा

पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते. या घटकांचा हृदय निरोगी राखण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. त्यामुळे जेवणात पालेभाज्यांचा समावेश जरूर असावा.

 

जास्त अन्न खाऊ नये

एकाचवेळी जास्त अन्न खाल्याने पचन क्रियेवर आणि हृदयावर विपरीत परिणाम होतो. म्हणून दिवसाला ठराविक वेळेला थोडे थोडे अन्न खा.

 

मिठाचा वापर कमी करा

मिठाचा जास्त वापर केल्याने शरीरात कॉलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते आणि हे कॉलेस्ट्रोल हृदयासाठी अतिशय घातक ठरू शकते.

 

सिगारेट सोडून द्या

एका निरीक्षणामध्ये असे स्पष्ट झाले आहे की सिगारेट हृदयाला सर्वात जास्त नुकसानदायी ठरू शकते. म्हणून हृदय निरोगी राखायचे असेल तर लवकरात लवकर सिगारेट सोडा.

 

नेहमी हसत राहा

हसणे हा शरीरासाठी सगळ्यात उपयुक्त व्यायाम मनाला जातो. चेहऱ्यावर नेहमी ताण राहिल्यास त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून नेहमी मनमोकळेपणाने हसत राहा म्हणजे तुमच हृदय अगदी निरोगी राहील.

चला तर मग आतापासून लगेच या सवयी लावून घ्या आणि तुमच हृदय अगदी फिट राखा !!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: TelisamajSevak.com

Leave a Reply