आरोग्यासाठी गुणकारी दही

मुंबई : गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.

दह्यामधून प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटॅमिन बी- ६ आणि विटॅमिन बी-१२ सारखी अनेक पोषक तत्व मिळतात. त्याचप्रमाणे पोटाच्या विकारावरही दही उत्तम औषध आहे. तुम्हाला तुमच्या सौंदर्याची आणि आरोग्याची काळजी असेल तर रोज एक वाटी दही नियमित घेणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे रोज जेवणानंतर दही घेतल्याने अॅसिडीटीचा त्रास होत नाही. तसेच पचनासाठीही दही चांगले असते.

दह्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत ठेवण्यास त्याची मदत होते. तसेच दात आणि नखे मजबूत ठेवण्याचे कामही दही करते. हिंगाची फोडणी दिलेले दही खाल्याने सांधेदुखीला आराम मिळतो. आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही दही खूप गुणकारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]