आदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा

नाशिक – गाव-पाडय़ांवरील वंचित समाजासोबत दिवाळी साजरी करण्याची सामाजिक जाणीव मूळ धरत आहे. आपली दिवाळी वंचित घटकांसोबत साजरी करून या गरजूंच्या चेहऱ्यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही. कै. दिलिप किसनराव बागुल सामाजिक संस्था व ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने त्रंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेव गाव येथील धाराची वाडी येथे आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन फराळ वाटप व तेथील मुलांना शाळेय उपयोगी वस्तूंचे तसेच कपडे वाटप करून, भेटीगाठी घेऊन, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पिंगळे, तुषार शेलार, अमोल देशमुख, करणसिंग पवार, स्वप्नील जावळे, रोशन काठे, विजय दशमुखे, मिलिंद पिंगळे, विनय दिविचा, अक्षय व्यवहारे आदि पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-सुरेश पिंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]