ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थां, नाशिक तर्फे पतंग वाटप

नाशिक: पेठ रोड येथील श्री जलाराम निवासी मतिमंद विद्यालय येथील मुलांना मकर संक्रांति निमित्त ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थे तर्फे   पतंग तसेच मांज्या वाटप करण्यात आले. पतंग उडवतांना कश्या प्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे तसेच नायलॉन मांज्याचा वापर करू नये .  या विषयी परिसरातील मुलांना तसेच नागरिकांना संदेश देण्यात आला . सर्वानी मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम  साजरा केला त्या प्रसंगी संस्थेचे सस्थांपक अध्यक्ष सुरेश पिंगळे, प्रशांत बागुल, तुषार शेलार , प्रशांत वरपे, मिलिंद पिंगळे, स्वप्नील जावळे, आदी सभासद तसेच नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply