कंटेंट रायटिंग

सध्या सगळय़ाच स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर वाढल्या असल्याने आता करिअर निवडण्यासाठी बरेचसे करिअर ऑप्शन युवापिढी समोर उभे असतात, पण करिअर करायचे तरी कशात असा त्यांना प्रश्न सतत पडलेला असतो आणि इतरापेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळ्या क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा तर प्रत्येकालाच असते, तर मग असेच एक काहीतरी नवीन आणि वेगळे करिअर म्हणजे कंटेंट रायटिंग होय. आताच्या युवापिढीला कॉम्पुटरचे जास्तच वेड आहे, तर मग कंटेंट रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला इंटरनेटवर बसूनच काम करायचे असते. थोडक्यात बोलायला गेलो, तर इंटरनेटच्या वेबसाठी मुद्दे किंवा लेख लिहिणे अर्थात एखाद्या गोष्टीचे किंवा वस्तू इत्यादीची माहिती त्या आतले कंटेंट लिहिणे त्याला कंटेंट रायटिंग असे म्हटले जाते. पण सर्वप्रथम तुम्हाला त्यासाठी वेबसाइट बनवावी लागते. मग त्यावर एखाद्या गोष्ट ती काय आहे. त्याचा उपयोग व अन्य सर्व माहिती आणि त्याच संदर्भातील लेख या साइटवर लिहावे लागतात आणि सतत कायतरी नवीन आणि आपल्या वाचकांना लक्षात घेऊन रोज त्यांना वाचायला अजून, आवड निर्माण होईल असे लेख लिहावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला या सीटवर तुमच्या वस्तू, प्रोडक्ट, कंपनी किंवा प्रोडक्टचे नाव व त्याची लोकप्रियता या सीटवर करायची आणि आपले वाचकदेखील वाढले पाहिजे अशी योजना रचून त्यांनी लोकांना आकर्षित करणारे लेख लिहायला हवे. आता या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काही जास्त बाहेर कोर्सेस उपलब्ध नाही आहेत, तरी सुद्धा तुम्ही १२ वीनंतर मास मीडियाच्या कोर्सद्वारे या क्षेत्रात पाऊल ठेवू शकतात आणि या व्यतिरिक्त काही ठिकाणी शॉर्ट टर्म ऑन लाइन कोर्सेस पण आहेत, पण तुमची १५ वी झाल्यावर या कोर्सकडे वळू शकता आणि जर तुमचे मास मीडियाचा कोर्स पूर्ण असेल, तर मग तुम्हाला न्यूज रिडिंग किंवा लेख वाचनाची ट्रेनिंग दिली जाते आणि जर तुमचे त्यात व्याकरण चांगला असेल, तर तुम्हाला या सर्व गोष्टींचा उपयोग कंटेंट रायटिंगसाठी होईल आणि जर कोणाला आपल्या कंपनीचे नाव फेमस करायचे असेल, तर त्याचे कॉन्ट्रॅक्टदेखील तुम्हालाच घ्यायचे असतात आणि या कोर्सेसची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही इंटरनेटच्या मदतीने मिळवू शकतात. तुम्हाला पार्ट टाइम किंवा फुल टाइम करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]