बँक ऑफ इंडिया बोर्ड, मुंबई एकूण १६३ पदांची भरती

रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया सव्र्हिसेस बोर्ड, मुंबई ऑफिसर्स ग्रेड-बीच्या एकूण १६३ पदांची भरती करणार आहे.

(अराखीव – ७७, इमाव – ५२, अजा – २६, अज – ८) वयोमर्यादा – १ जुल २०१६ रोजी २१ ते ३० वष्रे (अजा/अज – २१ ते ३५ वष्रे, इमाव – २१ ते ३३ वष्रे). शैक्षणिक अर्हता – पदवी उत्तीर्ण (पदवी, १२ वी आणि १० वीला किमान ६० गुण आवश्यक. पदवी परीक्षेच्या सर्व सेमिस्टर्ससाठीचे सरासरी गुण पकडले जातील.) (अजा/अज/विकलांग यांना गुणांची अट ५०) (सीजीपीए/ओजीपीए/सीपीआय गुणांकण पद्धतीत ६० साठी ६.७५ आणि ५० साठी ५.७५ ग्राह्य धरले जातील.) निवड पद्धती – निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत यातून. (१) फेज -१ ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची २०० गुणांसाठी सामान्य माहिती/जाणीव, इंग्रजी, गणितीय क्षमता आणि कारणे या विषयांवर आधारित. कालावधी – १२० मिनिटे. (२) फेज – २ ऑनलाईन परीक्षा – पेपर-१ इकोनॉमिक्स आणि सोशल इश्यूज् (ऑब्जेक्टिव्ह टाईप), पेपर-२ – इंग्रजी लेखनकौशल्य. (डिस्क्रीप्टीव्ह – संगणकाच्या सहाय्याने); पेपर-३ – फिनान्स अॅण्ड मॅनेजमेंट (ऑब्जेक्टिव्ह टाइप). फेज – २ मधील प्रत्येक पेपर १०० गुणांसाठी. वेळ प्रत्येकी ९० मिनिटे. फेज – २ च्या गुणवत्तेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. अंतिम निवड फेज – २ च्या एकंदर गुणांत मुलाखतीचे गुण मिळवून केली जाईल. विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण. अजा/अज/इमाव/विकलांग उमेदवारांसाठी फेज-१ आणि फेज-२ साठी एकत्रितपणे दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी रिजनल डायरेक्टर/जनरल मॅनेजर रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया यांना विनंती अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. रिझव्र्ह बँक सव्र्हिसेस बोर्ड अशा अर्जाची दखल घेणार नाही. ऑनलाइन अर्जाचे रजिस्ट्रेशन www.rbi.org.in या संकेतस्थळावर ९ ऑगस्टपर्यंत करावेत. परीक्षा शुल्क – ८५० रुपये (अजा/अज/ विकलांगांसाठी १०० रु. ) ऑनलाइन फेज-१ परीक्षा ४ सप्टेंबर रोजी आणि ऑनलाइन फेज-२ परीक्षा १९ सप्टेंबर २०१६ रोजी घेतली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]