पक्षी अभयारण्यात महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचे आगमन

निफाड – महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षाचे आगमन झाले आहे. थंडीची चाहूल लागताच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो चे आगमन झाले आहे यामुळे अभयारण्यात विलोभनीय दृश्य पहावयास मिळते असून निसर्गाचे वैभव अधिक खुलले आहे हे फ्लेमिंगो युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी नांदूरमध्यमेश्वरला येतात, त्याचे प्रमुख- खाद्य म्हणजे मासे, उथळ पाण्यावरील शेवाळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने फ्लेमिंगोचे वास्तव्य नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात असते,फ्लेमिंगो चे मोहक रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. पर्यटकांना माहिती देण्यासाठी येथे गाईड म्हणून गंगाधर आघाव, अमोल दराडे, डॉ उत्तम डेर्ले, दत्ता उगावकर व इतरही मार्गदर्शक आहेत.

– विनायक बागडे, निफाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]