बँकिंग क्षेत्रातील सुवर्णसंधी…

नाशिक जिल्हा तेली समाज महासभेच्या वतीने बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर (p.o.) चे अभ्यासवर्ग रविवार दि . 03 मे २०१५ पासून सुरु करण्यात आले आहेत . यामध्ये English , Quantitative Aptitude and Logic Reasoning  इ. विषयी मार्गदर्शन व या विषयानमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळविण्यआत विविध Trick and technique शिकविण्यात येणार आहेत.  हे मार्गदर्शन श्री. कृष्णा सुरेश शिरसाठ

B. E. Mech., M.B.A. हे करीत आहे. ते स्वतः एच .ए. एल . मध्ये व्यवस्तापनातील उच्च पद्स्त आहेत. विद्यार्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येते आहे.

मित्रानो पुढील ३ ते ५ वर्षात बँकींग  क्षेत्रात असंख्य जागा निघणार आहेत. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे १९७२ ते ८० मध्ये मोट्ट्या प्रमाणावर बँकींग क्षेत्रात भरती झाली होती. ते मनुष्यबळ आता निवृत्तीच्या मार्गावर आहे. ओ. बी. सी. साठी वयाची शिथिलता तर आहेच;  परंतु ह्या परीक्षेत जनरल विद्यार्थी फक्त ५ वेळा बसू शकतो तर ओ. बी. सी. ला ही संधी ७ वेळा आहे. मित्रानो को. ऑप्प. बँकामध्ये जी भरती होते त्यात आप्तेष्टांची वर्णी लागत असते. त्यामुळे तेथे आपल्याला संधी कमीच आहे. ह्या वर्षात विविध बँकांमध्ये पी. ओ. क्लार्कची भरती होत आहे. त्याची परीक्षा व जागा याची माहिती पुढे देत आहोत. विद्यार्थांनी अभ्यास वर्गाचा फायदा घेऊन आपले भविष्य निश्चित करावे. स्टेट बँक ऑफ इंडिया – पद: पी. ओ., एकूण जागा – २००० ( जाहिरात / परीक्षा दि. एप्रिल १५/ जून १५ ), स्टेट बँक ऑफ इंडिया – पद: क्लार्क, एकूण जागा – ६००० ( जाहिरात / परीक्षा दि. ऑक्टो. १५/ दिसें. १५.), आ. बी. पी. एस. – पद: पी. ओ. एकूण जागा – १०००० ( जाहिरात / परीक्षा : ऑगस्ट १५ / ऑक्टो. १५. ) , आय. बी. पी. एस. – पद : क्लार्क , एकूण जागा – ३०००० ( जाहिरात / परीक्षा दि. ऑक्टो. १५/ दिसे १५), स्टेट बँकेच्या असोसिएत बँका – पद: पी. ओ., एकूण जागा – ३००० ( जाहिरात / परीक्षा दि. ऑगस्ट १५ ), स्टेट बँकेच्या असोसिअते बँका – पद: क्लार्क, एकूण जागा – ६००० ( जाहिरात / परीक्षा दि. नोहे. १५) स्टेट बँकेच्या असोसिअते बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ ह्येद्राबाद, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर इ. या बँकांच्या व्यतिरिक्त ICICI बँक , IDBI बँक यांच्याही जागा आहेत. ICICI साठी कुठलेही रेसेर्वेसिओन नाही. वर्षभरात ७० ते ७५ हजार जागांची भरती होणार आहे; म्हणूनच आपण हा कार्यक्रम सुरु केला. पदवीधर   विद्यार्थांनी याचा फायदा उचलावा हीच इच्हा. ह्या अभ्यासाचा फायदा NET, SET, रेल्वे भरती व ईन्सुरन्स   सेक्टरच्या परिक्षांना सुद्धा होणार आहे. समाज बांधवांनी यासाठी प्रयत्न करावेत.

One thought on “बँकिंग क्षेत्रातील सुवर्णसंधी…

  • August 24, 2015 at 5:08 am
    Permalink

    It’s a very important information, Thanks a lot!!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


CAPTCHA Image
Play CAPTCHA Audio
[ Different Image ]