तेली समाजाचे पंतप्रधान

भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमतासोबत मिळालेल्या विजयाने सुरू झालेल्या मागील वर्षभरात देशाला निर्णायक नेतृत्व आणि दूरदृष्टीची दिशा बाळगणाऱ्या ‘मोदीयुगा’ची ओळख झाली. परंतु, देशभरातील लोकांच्या मनातील भावना आणि मते पाहता मला असे वाटते की, सामान्य माणसासाठी तयार केलेल्या धोरणांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी, तसेच ‘सब का साथ, सब का विकास’चा नारा सत्यात उतरविण्यासाठी आणखी काही निर्णायक पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे. ही उद्दिष्टे गाठण्यासाठी सरकार, विरोधी पक्ष आणि सर्व भागीदारांना सोबत घेऊन काम करणे महत्त्वाचे ठरेल. 
 
आपल्या सरकारने जाहीर केलेले अनेक उपक्रम देशाच्या आर्थिक- सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकतात. ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांचे सर्वच सामाजिक- आर्थिक स्तरांतील लोकांकडून मनापासून स्वागत झाले आहे. या उपक्रमांमुळे जागतिक पातळीवर भारताचे स्थान उंचावत आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘स्कील इंडिया’सारखे एकूण देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) चालना देणारे उपक्रम आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरणार आहेत. त्यामुळे देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील; तसेच थेट परदेशी गुंतवणुकीस चालना मिळेल. ‘जन धन योजना’ आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या योजना समाजात बदल घडवून आणतील.
 
पुढील निवडणुकीपर्यंत अद्याप आपल्या हातात चार वर्षांचा कालावधी आहे, तोपर्यंत आपण दिलेली आश्‍वासने प्रत्यक्षात येऊ शकतात, अशी मला आशा वाटते. सध्याची प्रगतीची गती लोकांचा आणि कार्पोरेट जगताचा अपेक्षाभंग करणारी आहे. आज लोकांना तुमच्याकडून टप्प्याटप्प्याने नव्हे, तर मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. देशाला पुढील तीन ते पाच वर्षांत होऊ शकणाऱ्या ‘मोठ्या आणि जलद परिणामांची’ गरज आहे. अगदीच नाही तरी पुढील दहा वर्षांत हे बदल व्हायला हवेत. 

Leave a Reply